नाथाभाऊ नक्कीच पक्षांतर करणार – ना. गुलाबराव पाटील

जळगाव प्रतिनिधी । भाजपचे मातब्बर नेते एकनाथराव खडसे हे नक्कीच पक्षांतर करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज केले आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या संभाव्य पक्षांतराबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. एकनाथराव खडसे यांनी याबाबत अद्याप आपले पत्ते खुले केले नसले तरी ते राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमिवर, ना. गुलाबराव पाटील यांनी आज अजिंठा विश्रामगृहात पत्रकारांशी बोलतांना केलेले वक्तव्य हे नव्या चर्चेला निमंत्रण देणारे ठरले आहे.

ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, एकनाथराव खडसे हे नेमक्या कोणत्या पक्षात जाणार वा ते कोणाच्या संपर्कात आहेत हे स्पष्ट झालेले नसले तरी ते नक्कीच पक्षांतर करणार आहेत. यामुळे नाथाभाऊ आता राष्ट्रवादीत जाणार की शिवसेनेत याबाबत चर्चा रंगली आहे.

Protected Content