Home क्राईम कोळवद येथील योगेश सुर्यवंशी बेपत्ता

कोळवद येथील योगेश सुर्यवंशी बेपत्ता

0
103
bepatta 1
bepatta 1

bepatta 1

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोळवद येथील तरुण दि. 25 जून रोजी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत माहिती अशी की, योगेश सोपान सुर्यवंशी (वय 26) कोळवद येथे राहत असून, लक्झरी बसची तिकीट बुकिंग करुन येतो, असे सांगून (दि. 25 जून) रोजी 11:30 वाजता यावल येथे आलेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतलाच नाही. योगेशचा मोबाईलही बंद येत असल्यामुळे त्याला शोधण्यास सुरुवात केली असून पण तो कुठेही आढळून आलेला नाही. परंतू त्यादिवसापासून आतापर्यंत तो घरी परतलेला नाही आहे. यावल पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान हा युवक कुणाला दिसून आल्यास यावल पोलिस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक सुजीत ठाकरे व त्याच्या कुंटुबाच्या मंडळीकडुन ओळख पटली असून, पुढील तपास पोलीस नाईक सिकंदर तडवी करीत आहेत.


Protected Content

Play sound