जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत जळगाव क्रीडा विभागाच्या दि. 31 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेत खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या महिला संघाने विजेतेपद प्राप्त केले.
अंतिम सामन्यात डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महाविद्यालयाच्या संघाविरुद्ध 13-10 अशा फरकाने हा विजय मिळवला. या स्पर्धेत महिलांच्या एकूण पाच संघांनी सहभाग घेतला होता. या विजयी संघामध्ये सोनल हटकर (कर्णधार), दीपिका नंदवालकर, श्रुती अहिरे, प्राजक्ता पाटील, पूनम बोदडे, सुनीता पावरा या खेळाडूंचा अंतर्भाव होता. या खेळाडूंना प्रा. प्रवीण कोल्हे यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे, उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी, विभाग प्रमुख प्रा. निलेश जोशी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व खेळाडू व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.