काश्मिरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा


1551586524 jammuandkashmir AP

श्रीनगर (वृत्तसंस्था)। काश्मिरमधील हंदवाडामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत.

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारपासून हंदवाडा परिसरात चकमक सुरू आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला होता. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here