कर्जोतजवळ आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

accident jal

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील कर्जोत जवळील अज्ञात आयशर गाडीने भरधाव वेगाने येऊन दुचाकीस्वारास धडक देऊन गंभीर दुखापत झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या सुत्रांनुसार, लोणी (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असलेला अर्जुन सुभाष पारसे (वय-29) हा त्याच्या खाजगी काम निमित्त रावेरा येथे आला होता. काम आटोपल्यानंतर रावेरातून पुन्हा बुऱ्हाणपूर येथे जात असतांना कर्जोत गावाजवळ बुरहानपूरकडून रावेरच्या दिशेने येणाऱ्या आयशर गाडीने जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीस्वारास अर्जुन पारसे याला गंभीर दुखापत झाली आहे. घटनास्थळावरुन आयशर गाडीसह चालक फरार झाले आहे. जखमीस रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content