जळगावातील व्यापारी वर्गाकडून एलसीबी पथकाचे कौतूक

jalgaon vyapari news

भुसावळ प्रतिनिधी । जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहनांच्या शोरुम फोडण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे पोलीसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते. मात्र जळगाव गुन्हा शाखेच्या पथकाने या संशयित आरोपीचा छडा लावला आणि त्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक म्हणून जळगाव शहरातील व्यापारी वर्गाने पोलीसांचे आभार व्यक्त करुन सुटकेचा श्वास सोडला आहे. जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता त्यामुळे व्यापारी वर्गासह सामान्य जनते मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. चोरट्यांनी पोलीसांसमोर मोठे आव्हान निर्माण केले होते. मात्र पाच संशयित चोरटे जेरबंद करण्यात जळगाव शाखेच्या पथकाला यश आल्याने व्यापारी वर्गासह सामान्य लोकांमध्ये आंनद व्यक्त केला जात आहे. जळगाव शहरातील व्यापारी वर्गाने आज पोलीसांचे आभार व्यक्त केले.

Protected Content