Home मनोरंजन करिश्मा कपूरने आलिशान घर दिले भाड्याने ; महिन्याला मिळणार इतकी रक्कम

करिश्मा कपूरने आलिशान घर दिले भाड्याने ; महिन्याला मिळणार इतकी रक्कम

0
9


मुंबई-वृत्तसेवा। बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. दिवंगत माजी पती संजय कपूर यांच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीवरील कायदेशीर वाद सुरू असतानाच करिश्माने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील आपले आलिशान घर भाड्याने दिले आहे. या घरातून तिला दर महिन्याला तब्बल 5.51 लाख रुपयांचे भाडे मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करिश्मा कपूरने वांद्रे पश्चिम येथील हिल रोडवरील ग्रँड बे कॉन्डोमिनियममधील आपले निवासी युनिट भाडेतत्त्वावर दिले आहे. या व्यवहाराची अधिकृत नोंदणी नोव्हेंबर 2025 मध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील माहिती देणाऱ्या स्क्वेअर यार्ड्सच्या अहवालानुसार, या घराचे मासिक भाडे 5.51 लाख रुपये निश्चित करण्यात आले आहे. वांद्रे पश्चिम हा मुंबईतील सर्वाधिक मागणी असलेल्या उच्चभ्रू भागांपैकी एक मानला जातो. या परिसराची उत्तम कनेक्टिव्हिटी, समुद्रकिनाऱ्याची जवळीक, बीकेसी, माहीम, सांताक्रूझ यांसारख्या महत्त्वाच्या भागांशी असलेला संपर्क आणि आलिशान जीवनशैली यामुळे येथील मालमत्तांना मोठी मागणी आहे. करिश्माच्या या घराचे कार्पेट क्षेत्रफळ सुमारे 204.38 चौरस मीटर म्हणजेच जवळपास 2,200 चौरस फूट आहे. या व्यवहारात तीन कार पार्किंगच्या जागांचाही समावेश आहे. घर भाड्याने देताना 20 लाख रुपयांच्या डिपॉझिटचा करार करण्यात आला असून, मुद्रांक शुल्क म्हणून 17,100 रुपये आणि नोंदणी शुल्क म्हणून 1,000 रुपये भरल्याची माहिती समोर आली आहे.

या भाडेकरारानुसार नोव्हेंबर 2025 पासून करिश्माला मासिक 5.51 लाख रुपये मिळणार आहेत. म्हणजेच संपूर्ण करार कालावधीत तिला सुमारे 66.12 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील प्रीमियम भागातील मालमत्तांमधून मिळणारे हे उत्पन्न सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. दरम्यान, करिश्मा कपूरचे माजी पती संजय कपूर यांच्या सुमारे 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरून न्यायालयीन वाद सुरू आहे. संजय कपूर यांचे वयाच्या 53 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. करिश्मा आणि संजय यांचा घटस्फोट अनेक वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर संजय कपूर यांनी प्रिया सचदेव यांच्याशी विवाह केला होता.

घटस्फोटानंतर करिश्माने एकल आई म्हणून आपल्या दोन्ही मुलांचे संगोपन केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलांच्या संगोपनासाठी संजय कपूर करिश्माला आर्थिक मदत करत होते. घटस्फोटानंतर मुलांचा ताबा करिश्माकडे देण्यात आला होता, तर संजय यांना मुलांना भेटण्याचा अधिकार देण्यात आला होता. काही अहवालांनुसार, घटस्फोटाच्या वेळी संजय कपूर यांनी खार येथील त्यांच्या वडिलोपार्जित घराचा हक्क करिश्माच्या नावावर केला होता. तसेच मुलांच्या भविष्यासाठी 14 कोटी रुपयांचा बाँड खरेदी केल्याची माहितीही समोर आली होती.


Protected Content

Play sound