कामांच्या कंत्राटाचा गैरपद्धतीने वाटप होत असल्याचा आरोप – मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्हा परिषदेत ‘अंतर्गत काम वाटप समिती’च्या माध्यमातून कामांचे कंत्राट गैरपद्धतीने वाटप केले जात असल्याचा आरोप सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी केला असून याबाबत जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आज दुपारी निवेदन देण्यात आले आहे.

आज गुरुवार, दि. ३० जून रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “जिल्हा परिषद अंतर्गत काम वाटप समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून १० लाख रुपयांच्या आत असलेल्या कामांचा टेंडर सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना देण्याची तरतूद असते. दर महिन्याला समितीच्या माध्यमातून कामांचे वाटप केले जाते. परंतु गेल्या चार ते पाच महिन्यांपासून समितीने कुठल्याही पद्धतीने ऑनलाईन यादी जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर अपलोड न करता नजीकच्या लोकांना आणि जिल्हा परिषदेचे कर्मचारी हे ठेकेदार म्हणून काम करत आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार असलेले अभियंता यांना कुठलीही कामाची माहिती मिळत नाही वा काम मिळत नाही.

जळगाव जिल्ह्यात हजारो संख्येने सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहेत. परंतु राजकीय पुढार्‍यांच्या नजीकच्या अभियंतांचे काम केले जात असल्याचा आरोप देखील यावेळी उपस्थित बेरोजगार अभियंता यांनी केला. या संदर्भात जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/606965447227374

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1001633857212614

Protected Content