कुंभार समाजाचा परिचय मेळावा उत्साहात

kumbhar samaj melava faizpur

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । जिल्हा कुंभार समाज संचलित रावेर-यावल तालुका परिसर कुंभार समाजातर्फे आयोजित जिल्हास्तरीय वधू वर परिचय मेळावा नुकताच पार पडला.

येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात या परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबन जगदाळे होते. सुरेश बहाळकर व प्रभाकर कापडे यांनी कुंभार समाजात वधुवर परिचय मेळावा ही काळाची गरज असल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले. यानंतर उत्तमराव काळे यांनी ही मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक माजी नगरसेवक तथा वधुवर परिचय समिती प्रमुख मनोज कापडे यांनी केले. कार्यक्रमाला कुंभार समाज नाशिक विभागीय माजी अध्यक्ष सुभाष कुंभार, प्रदेश युवा सचिव किशोर कुंभार, हृदेश चव्हाण, उत्तमराव काळे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष भगवान कुंभार,माजी जिल्हाध्यक्ष प्रभाकर कापडे,नंदुरबार युवा जिल्हाध्यक्ष दिनेश वाडीले, नगरसेविका सौ पुष्पा कापडे, सौ वत्सला कुंभार, विवरे ग्रामपंचायत सदस्य सौ आशा हरणकर, विचखेडा उपसरपंच सौ नीता सपकाळ,प्राध्यापिका सौ मंगला सखाराम मोरे, समाज भूषण जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे, सुभाष पंडित, धनराज सोनवणे,अशोक पंडित, रामदास प्रजापती,सखाराम मोरे, नारायण पुन्नासे, धनलाल शिरसाठ,शिरपूर तालुका अध्यक्ष गोकुळ कुंभार, विलास न्हावकर, वसंत सपकाळे, सीताराम प्रजापती, घनश्याम हरणकर आदींची उपस्थिती होती.

यशस्वीतेसाठी संतोष कापडे, वासुदेव कापडे, लिलाधर कापडे, विजय पंडित, किरण कुंभार यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला चाळीसगाव , नंदुरबार, बुर्‍हाणपूर, जामनेर,बोदवड येथून आलेल्या ८५ मुलांनी तर २५ मुलींनी परीचय करून दिला त्याच प्रमाणे न्हावी येथील सुमनबाई कापडे यांनी येत्या पुण्यतिथीला त्यांचे राहते घर ७०० स्केवर फूट असलेले न्हावी येथील कुंभार समाजाला गोरोबाकाका च्या मंदिराला दान करण्याची घोषणा केली.

Protected Content