चोपडा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चोपडा ( प्रतिनिधी )| येथील विवेकानंद विद्यालयातील दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

विद्यालयाचा निकाल 99.24 टक्के लागला.133 विद्यार्थी प्रविष्ठ होते. त्यापैकी 90 टक्के च्या वर 19 विद्यार्थी, विशेष प्राविण्य 57 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 43 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 9 विद्यार्थी, पास श्रेणीत 4 विद्यार्थी उत्तिर्ण चोपडा तालुक्यातून व विद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान योगेश कांतीलाल पाटील 97.20 टक्के, चोपडा तालुक्यातून द्वितीय प्रथमेश अनिल कोठावदे 97 टक्के चोपडा तालुक्यातून तृतीय व मुलींमध्ये सर्वप्रथम अनुष्का रवींद्र पाटील 96.40 टक्के चतुर्थ भाग्येश राजेंद्र सोनवणे व सृष्टी सुशीलकुमार सूर्यवंशी 95.80 टक्के पाचवी ओजस्विनी भरत पाटील 95.60 टक्के सहावा व सहावी तुषार शशिकांत बागुल व मनस्वी जनार्दन विसावे 94.60 टक्के सातवा मयूर किरण पाटील 94.40 टक्के आठवा अजय धनराज पाटील 93.40 टक्के नववा आशय लोकेन्द्र महाजन 93 टक्के दहावा ऋतुराज प्रवीण पाटील 92. 80 टक्के अकरावी व अकरावा सृष्टी नीलाचंद पाटील, जितेंद्र विकास पाटील व पूर्वेस राजेंद्र महाजन 91 टक्के बारावी चहक सुहास अग्रवाल 90. 80 टक्के तेरावी संविधान प्रमोद पाटील 90.40 टक्के चौदावी रिया संजोग साळुंखे 90.20 टक्के पंधरावा मयुरेश्वर कैलास बाविस्कर 90 टक्के गुण प्राप्त केले.

शाळेच्या या घवघवीत यशाबद्द्ल यशस्वी विद्यार्थाचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे, पालकांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड.रविंद्र जैन, विश्वस्त सुधाकर केंगे, मंगला जोशी, मुख्याध्यापक नरेंद्र भावे, रंजना दंडगव्हाळ, डॉ. लोकेंद्र महाजन, नगरसेवक डॉ. रविंद्र पाटील, कांतीलाल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात शालेय प्रार्थनेने झाली , प्रास्ताविक मुख्याधापक नरेंद्र भावे यांनी केले. कार्यक्रमाचे फलक लेखन व छायाचित्रण राकेश विसपुते यांनी तर सुत्रसंचलन व आभार उपशिक्षक संदीप कुलकर्णी व उपशिक्षक पवन लाठी यांनी केले. कार्यक्रमास सर्व विभागाचे शिक्षकवृंद, पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content