यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील बावीस वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीती अनुसार रवीन्द्र रमेश गायकवाड वय २२ वर्ष, धंदा मोल मजुरी राहणार बाजारपटा परिसर किनगाव तालुका यावल या अविवाहीत तरूणा दिनांक ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ते ५वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील दरवाजे बंद करून छताला दोरी बांधुन दोरीच्या सहाय्याने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन आई वडील हे शेतातुन मजुरी करून परतल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
मयत रवीन्द्र गायकवाड या तरुणाचे मृतदेह यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिळके यांनी शवविच्छेदन केले. या संदर्भात यावल पोलीसात मयताचे मामा उखा रामलाल जाधव यांनी खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे. या अविवाहीत तरूणाने आत्महत्या का केली असावी याचे कारण मात्र समजु शकले नाहीत. मयताच्या कुटुंबात आई, वडील, एक भाऊ ,बहीण आहेत . दरम्यान मागील पाच दिवसातील किनगाव गावातील तरुणाने आत्महत्या केल्याची ही दुसरी घटना आहे.