राजकमल टॉकीज परिसरातून शासकीय कर्मचाऱ्याची दुचाकी लांबविली

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील राजकमल टॉकीजच्या शेजारी असलेल्या पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या पार्किंगला लावलेली कर्मचाऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरूवारी २४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, किशोर अविनाश पाटील (वय-४६) रा. शिरसोली ता.जि.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. जळगाव शहरातील राजकमल टॉकीजच्या बाजूला असलेल्या पशुसंवर्धन विभागात पशुधन पर्यवेक्षक म्हणून नोकरीला आहे. त्यांच्याकडे त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीए ९३६३) ने घर ते ऑफिस यासाठी वापर करतात. नेहमीप्रमाणे बुधवारी २३ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता किशोर पाटील हे त्यांची दुचाकी घेऊन त्यांच्या कार्यालयात आले होते. दुपारी ४ वाजता त्यांनी कार्यालयाच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत दुचाकी पार्क करून लावली, त्यानंतर सायंकाळी ६ वाजता ते त्यांच्या मित्रांच्या कारमध्ये बसून भुसावळला निघाले. भुसावळ येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी गुरुवारी २४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता दुचाकीजवळ आले असता त्यांना त्यांच्या पार्किंगच्या ठिकाणी दुचाकी मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी दुचाकीचा इतर सर्वत्र शोध घेतला, त्यांची दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर शनिवारी २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content