गावठी दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील कोळीवाडा परिसरात शनिवारी दुपारी वाजता बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या तरूणावर रामानंदनगर पोलीसांनी कारवाई केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रामानंद नगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पिंप्राळा भागातील कोळीवाडा परिसरात राहत्या घराच्या आडोश्याला गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची गोपनिय माहिती रामांनगर पोलीसांना मिळाली. पोलीस पथकातील पोहेकॉ संजय सपकाळे, सुशिल चौधरी, विजय खैरे, राजेश चव्हाण, रविंद्र चौधरी, पोलीस शिपाई उमेश पवार यांनी शनिवारी २६ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कारवाई केली. यात कपिल रमेश सपकाळे (वय-२०) रा. कोळीवाडा, पिंप्राळा हा बेकायदेशीरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करतांना आढळून आला. त्यावर पोलीसांनी कारवाई करत त्याच्याजवळील ३५ लिटर तयार गावठी हात भट्टीची दारू हस्तगत केली. याप्रकरणी पोलीस शिपाई उमेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी कपिल सपकाळे यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content