Home Cities धरणगाव धरणगावातील पत्रकारांकडून पत्रकार संवाद यात्रेचे स्वागत

धरणगावातील पत्रकारांकडून पत्रकार संवाद यात्रेचे स्वागत


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांची पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा काढण्यात आली आहे. या पत्रकार संवाद यात्रेचे धरणगाव येथे स्वागत करण्यात आले. यावेळी विविध संघटनांनी संवाद यात्रेला पाठींबा दिला आहे.

याप्रसंगी शिवसेना सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, युवासेना जिल्हा संघटक तथा पत्रकार विनोद रोकडे, उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री, जीभाऊ पाटील, जेष्ठ पत्रकार बी.एन. चौधरी, डी.एस. पाटील, किरण रडे, तालुका अध्यक्ष धर्मराज मोरे, लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे प्रतिनिधी तथा शहराध्यक्ष अविनाश बाविस्कर, राष्ट्रवादीचे नेते मोहन पाटील, नामदेव मराठे, जनकल्याण पतसंस्थाचे राजेंद्र पाटील, राजू बाविस्कर, धनराज पाटील यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound