अल्पसंख्याक विकास मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी पत्रकार मुराद पटेल यांची निवड


चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव येथील खडकी बुद्रुकचे माजी उपसरपंच आणि पत्रकार मुराद इब्राहिम पटेल यांची अल्पसंख्यांक विकास मंडळ, जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. अल्पसंख्यांक विकास मंडळ ही एक सामाजिक संघटना असून, तिचे सामाजिक नेतृत्व आणि चळवळ संस्थापक अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष शोएबभाई खाटीक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात सुरू आहे.

जिल्हा कार्यकारणी लवकरच जाहीर होणार
राज्य कार्यकारणी झाल्यानंतर राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली. यामध्ये जळगाव जिल्हाध्यक्षपदासाठी मुराद इब्राहिम पटेल यांची निवड प्रदेशाध्यक्ष शोएबभाई खाटीक यांनी केली आहे. निवडीनंतर मुराद पटेल यांनी बोलताना सांगितले की, ते लवकरच जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुका अध्यक्षांची कार्यकारणी जाहीर करणार आहेत.

सर्वातून अभिनंदनाचा वर्षाव
या निवडीबद्दल जिल्ह्यातून आणि चाळीसगाव तालुक्यातून व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि भ्रमणध्वनीवरून नागरिकांनी मुराद पटेल यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस अनेकांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. माजी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीवदादा देशमुख, पारोळा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष करण पवार पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

संघटना मजबूत करण्याची ग्वाही
या निवडीबद्दल बोलताना मुराद पटेल म्हणाले की, “अल्पसंख्यांक विकास मंडळाचे संस्थापक व प्रदेशाध्यक्ष शोएबभाई खाटीक यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. मी नक्कीच संघटना मजबूत करण्याचे काम करेन.”