महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या खान्‍देश विभागीय सचिवपदी पत्रकार बाळासाहेब पाटील

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या (जळगाव, धुळे, नंदुरबार) खान्देश विभागीय सचिव पदी बाळासाहेब पाटील यांची नियुक्ती तर पारोळा तालुका अध्यक्षपदी अभय पाटील यांची एक मताने निवड करण्यात आली.

यात विभागीय पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे, प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंढे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, राज्य संपर्क प्रमुख किशोर रायसाकडा,खान्देश विभागीय अध्यक्ष प्रमोद सोनवणे यांच्या सुचनेनुसार करण्यात आली. पत्रकार संघाचे कार्य वाढिस आपण तत्पर व पत्रकारांना न्याय एक संघ कसा करता येईल एक संघ कसं राहता येईल या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार पत्रकार बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांची विभागीय अध्यक्ष प्रमोद सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार भूपेंद्र मराठे, दिलीप सोनार, रमेश जैन, प्रदीप पाटील, समाधान मैराळे, ‌बाळू पाटील, योगेश पाटील, बापू वाडीले, सुनील महाजन, प्रकाश पाटील, ‌सुनील काळे, प्रल्हाद पवार, राजेंद्र खैरनार, गजानन गिरी, राकेश सुतार अबरार मिर्झा, प्रमोद पवार आदी उपस्थित होते. यावेळी तालुका अध्यक्ष अभय पाटील यांनी लवकरच तालुक्यातील व ग्रामीण कार्यकारणी जाहीर करण्यात येईल अशी यावेळी त्यांनी बोलताना सांगितले.

Protected Content