धनाजी नाना महाविद्यालयात एनसीसी ए प्रमाणपत्र परीक्षा संपन्न !

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेची जुनियर डिव्हिजन ए प्रमाणपत्र परीक्षा यशस्वीपणे संपन्न झाली.

यात फैजपूर, सावदा, खिरोदा, भालोद, सांगवी, साकेगाव, पाल, वरणगाव, बोदवड, मुक्ताईनगर येथील ४०० कॅडेट्स यांची ए सर्ट प्रमाणपत्र परीक्षा यशस्वीपणे संपन्न झाली. यासाठी 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे सुभेदार मेजर प्रेमसिंग, सुभेदार रामकिशनसिंग, हवालदार बलवीरसिंग, हवालदार जॉन मोहम्मद यांच्यासहित 12 एनसीसी अधिकारी व केअर टेकर अधिकारी यांनी परीक्षेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम केले. पंचक्रोशीतील जूनियर डिव्हिजनच्या कॅडेटस परीक्षेसाठी ग्राउंड उपलब्ध करून देण्यात तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री शिरीषदादा चौधरी सर्व, सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघुळदे, एन सी सी अधिकारी कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी सहकार्य केले. यामुळे सहभागी कॅडेटसचे परीश्रम व पैसे वाचलेत व सोबत प्रवासाची जोखीमही कमी झाली.

यासाठी 18 महाराष्ट्र बटालियनच्या वतीने व सहभागी सर्व शाळांच्या वतीने संस्था पदाधिकारी व प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. धनाजी नाना महाविद्यालय राष्ट्रीय छात्र सेनेच्या विविध उपक्रमास नेहमीच सक्रिय प्रतिसाद देत असून मागील दहा वर्षात पाच वार्षिक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात महाविद्यालयाने पुढाकार घेतला असून असे महाविद्यालय बटालियनमध्ये एकमेव आहे. यासोबत फायरिंग रेंज व ऑप्टिकल कोर्स असलेले सुद्धा एकमेव महविद्यालय आहे याचा अभिमान असल्याची मनोगत कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी व्यक्त केले.

Protected Content