जळगाव लोकसभेची उमेदवारी गुलाबराव वाघ यांना द्या !; शिवसेना शिष्टमंडळाची मागणी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सध्या राज्य सह देशात लोकसभा निवडणुकीची चाहूल लागली असून राजकीय पक्षात उमेदवार ची चाचपणी जोरदार सुरू असून जळगाव लोकसभा मतदार संघात , जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिष्टमंडळाने शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भागळे यांना गेली ३६वर्षांपासून शिवसेनेचे एकनिष्ठ असलेले शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांना जळगाव लोकसभा ठाकरे गटाला सुटल्यास गुलाबराव यांचा नावाचा विचार व्हावा अशी मागणी जोर धरू लागली.

गुलाबराव वाघ यांनी शिवसेना तालुका प्रमुख ते शिवसेना जिल्हाप्रमुख पदासह आता जळगाव लोकसभा सहसंपर्क प्रमुख म्हणून भूमिका पाहत आहे. त्यांच्याकडे उत्तम असे संघटन कौशल्य असून गाव खेड्यातील शिवसैनिकपर्यत थेट संबंध आहेत. शिवसेना फुटीनंतर ते उध्दव साहेबवर एकनिष्ठ असून जळगाव जिल्ह्यातील तळ सांभाळत आहे. त्याचा कामाचा दांडगा अनुभव असून त्याचा ३६ वर्षची निष्ठा फळ मिळावं म्हणून जळगांव लोकसभा निवडणुकीत त्याना उमेदवारी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. या मागणीचे निवेदन निवेदन युवासेना जिल्हा प्रमुख तथा मा लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी उपजिल्हा प्रमुख ऍड शरद माळी, भाऊसाहेब सोनवणे, माजी जि.प.उपाध्यक्ष जानकीराम पाटील, तालुका प्रमुख जयदीप पाटील, जळगाव तालुका प्रमुख उमेश पाटील, शिवसेना धरणगाव शहरप्रमुख भागवत चौधरी, युवासेना उपजिल्हा प्रमुख अविनाश पाटील, युवासेना विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय लाड, युवासेना तालुका प्रमुख स्वप्नील परदेशी, शिवसेना पदाधिकारी विनोद रोकडे , लीलाधर पाटील सचिन चौधरी, राहुल घुगे, नंदू पाटील, रमेश पांडे यांच्यासह आदींनी केली आहे.

Protected Content