अखेर मोर नदीवरील ‘त्या’ पुलाचे सेफ्टी होणार ऑडिट !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अंजाळे येथील मोर नदीच्या पुलावरील धोकेदायक वळणाने तीन बळी घेतल्यानंतर भाजपने इशारा देताच जलसंपदा खात्याच्या अधिकार्‍यांनी या पुलाचे सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावल ते भुसावळ मार्गावरील अंजाळे गावाजवळच्या मोर नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या तांत्रीक गोंधळामुळे हा पुलावरचा मार्ग अत्यंत धोकादायक व जिवघेणा बनला असुन याची तात्काळ संबंधीत अधिकारी यांनी दखल घ्यावी अन्यथा यानंतर या ठिकाणी अपघात घडल्यास व त्यात कुणी मरण पावल्यास संबधित अधिकारी यांच्या विरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल अशी जनभावना नागरीकांमध्ये निर्माण झाली आहे.
याची दखल घेत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी घेतली. ते यावल येथे पक्षाच्या गावचलो अभियान संदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन करण्यासाठी आले असता अंजाळे घाटावरील मोर नदीवर बांधण्यात आलेला पुल हा वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक व जिवघेणा बनला असून,मोठा अपघात टाळण्यायासाठी तात्काळ उपाय योजना व्हावी अशी मागणी उपस्थित पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त व नागरीकांसह उपस्थित पत्रकारांनी जावळे यांच्या कडे केली होती.

यावरून त्यांनी या विषयाची गार्ंभीयाने दखल घेत त्वरीत संबधीत वरिष्ठ अधिकारी यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला. यात्यांनी मागील एक महीन्यात या पुलावर भिषण अपघात होवुन तिन नागरीकांचा दुदैवी मृत्यु झाला असल्याची माहिती देवुन, या पुलाच्या धोकादायक वळणावर मोठा अपघात त्यात होणारी जिवीत हानी टाळण्यासाठी प्रसंगी या ठिकााणी तात्काळ सुरक्षा कवच,विविध ठिकाणी गतिरोधक झेब्रा क्रॉसींग व अपघाताचे वळण दर्शविणारे फलक लावण्यात यावे अशा सुचना केली.

अधिकार्‍यांनी याची त्वरीत दखल घ्यावी अन्यथा या ठिकाणी पुनश्न अपघात होवुन जिवीतहानी झाल्यास संबधीत अधिकारी यांच्या विरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी अशी मागणी देखील अमोल जावळे यांनी निवेदनात केली.

दरम्यान, याची त्वरीत दखल घेत आज दिनांक ५ फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी इरिगेशनचे ए. इ. भदाणे व कनिष्ठ अभियंता आरीफ सैय्यद यांनी मोर नदीच्या पुलावर भेट देवुन पुलाची पाहणी केली. येत्या १५ दिवसाच्या आत या ठिकाणी सुरक्षीत वाहतुकीच्या संदर्भात योग्य प्रकारे उपाययोजना व सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती संबधित अधिकारी यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना या वेळी दिली.

यामुळे आता मोर नदीवरील धोकादायक वळणावर सुरक्षेच्या उपाययोजना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Protected Content