
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) झारखंड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या ठिकाणी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. झारखंडमध्ये ३० नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यासाठी, ७ डिसेंबर रोजी दुसऱ्या, १२ डिसेंबर रोजी तिसऱ्या, १६ डिसेंबर रोजी चौथ्या आणि २० डिसेंबर रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार असून २३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यात आल्याने राज्यात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी आज जाहीर केले आहे. निवडणुकीचा दुसरा टप्पा ७ डिसेंबर, तिसरा टप्पा – १२ डिसेंबर, चौथा टप्पा – १६ डिसेंबर आणि शेवटचा पाचवा टप्पा २० डिसेंबर रोजी पार पडणार आहे. २०१४ मध्ये झारखंडमध्ये चार टप्प्यात निवडणूक पार पडली होती, तेव्हा भाजपाला सर्वाधिक ३७ जागा मिळाल्या होत्या. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२० संपुष्टात येणार आहे. झारखंडमधील एकूण मतदारांची संख्या २.२६ कोटी आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी पत्रकारपरिषदेद्वारे याबाबत माहिती दिली आहे. झारखंडमधील ८१ मतदारसंघापैकी ६७ मतदारसंघ हे नक्षलग्रस्त आहेत. शिवाय १९ जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. झारखंडमध्ये पहिल्यांदाच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना घरी बसून पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे. त्यांना घराशेजारी ईव्हीएमवर जाऊन मतदान करायचे नसेल तर पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याचा पर्याय त्यांना देण्यात आला आहे.