जेसीएल टी20 मध्ये सर्वांसाठी प्रवेश खुला व मोफत

जळगाव (प्रतिनिधी)। उद्यापासून सुरु होणार्‍या जळगाव क्रिकेट लीग अर्थात जेसीएल टी20 चे सामने बघण्यासाठी सर्वांना प्रवेश खुला व मोफत ठेवण्यात आलेला आहे. तसेच व्हीआयपी मोफत पासेस शहरातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स, नवजीवन सुपर शॉपची शहरातील चारही दालने, पगारिया ऑटो, सातपुडा ऑटोमोबाईल्स, वसंतस् दि सुपर शॉप, मकरा एजन्सीज्, शहरातील सर्व स्पोर्टस् शॉप, कांताई नेत्रालय आदी ठिकाणी मिळणार आहेत.

ज्यांना व्हीआयपी पास घेऊन जेसीएलच्या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे, त्यांनी येथून मोफत पासेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.

Add Comment

<p>Protected Content</p>