जेसीआय जळगाव डायमंड सीटीच्या भगिनींनी अंध अपंग विद्यार्थ्यांना बांधली राखी

WhatsApp Image 2019 08 16 at 6.13.30 PM

जळगाव, प्रतिनिधी | १५ ऑगस्ट व रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी जेसीआय जळगाव डायमंड सीटीतर्फे सामाजिक भान जपत अंध अपंग औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव येथे विद्यार्थासाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

संस्थेच्या महिला पदाधिकारीनीं राख्या बांधून तसेच फरसाण व मिठाई वाटप केले.   तेथील विद्यार्थाचा लोकांचा उत्साह, सकारात्मक दृष्टीकोन व आत्मविश्वास ह्याबद्दल जेसीआय जळगाव डायमंड सिटीचे अध्यक्ष जेसी जिनल जैन यांनी त्याचे कौतुक व प्रशंसा केले व तसेच जेसीआय डायमंड सिटीच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमाची संकल्पना ही जेसीआय जळगाव डायमंड सिटी चे जेसी प्रसाद जगताप व आयपीपी विजय सोनार यांची होती. या कार्यक्रमाचे प्रकल्प संचालक जेसी सविता सोनार होत्या. यशश्वितेसाठी जेसी प्रशांत पारीख , भंडारी , जेसी सुशील अग्रवाल , शुभांगी श्रीश्रीमाळ , छाया जांगडा आदींनी कामकाज पहिले.

Protected Content