Home क्राईम केतकी चितळेला अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांपैकी एक जण अटकेत

केतकी चितळेला अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांपैकी एक जण अटकेत

0
110

68611342
 

मुंबई (वृत्तसंस्था) ‘तुझं माझं ब्रेकअप’ फेम अभिनेत्री केतकी चितळेला अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीला गोरेगाव पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक केली आहे. सतीश पाटील असे ट्रोल करणाऱ्याचे नाव आहे.

काही दिवसांपूर्वी केतकीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिने हिंदी भाषेतून तिच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. यावरून केतकीच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून शेलक्या शब्दांत टीका करण्यात आली होती. यामध्ये काहींनी अश्लील, शिवराळ आणि खालच्या स्तरातील भाषा वापरली होती. याप्रकरणी सतीश पाटीलशिवाय इतरांची देखील माहिती काढण्यात येत असून त्यांनाही अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.


Protected Content

Play sound