नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय जनता पक्षाने जयदीप धनकड यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी याबाबत घोषणा केली.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड हे उमेदवार असतील. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर धनकड यांचे नाव जाहीर करण्यात आले. या पदासाठी भाजप कडून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, मुख्तार अब्बास नकवी, केरळचे राज्यपाल आरीफ महंमद खान, पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आदींच्या नावांची वेळोवेळी चर्चा होत होती. अखेरीस धनकड यांच्या उमेदवारीची घोषणा आज करण्यात आली.
भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी झाले होते. त्यानंतर धनकड यांची उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीची घोषना करण्यात आली. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा कार्यकाल १० ऑगस्टला समाप्त होत आहे.