दिलासा : लॉकडाऊनचे दिवस वाढणार नाहीत- केंद्राचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशात सध्या २१ दिवसांचा लॉकडाऊन असतांना याचा कालावधी वाढणार असल्याच्या चर्चेला केंद्र सरकारने पूर्णविराम दिला आहे. लॉकडाऊनला वाढविण्यात येणार नसल्याचे आज सरकारने स्पष्टपणे जाहीर केले आहे.

करोनाला आळा घालण्यासाठी २४ मार्च रोजी मध्यरात्रीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन घोषित केला असून आज या लॉकडाऊनचा सहावा दिवस आहे. यामुळे देशभरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच सोशल मीडियात लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आज केंद्राने याबाबत पहिल्यांदा भाष्य केले आहे. करोना व्हायरसच्या कारणानं लागू करण्यात आलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन आणखी वाढवण्याची कोणतीही योजना नाही, असं सध्या तरी केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. कॅबिनेट सेक्रेटरी राजीव गौबा यांनी, लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबद्दल सरकारची योजना नसल्याचं सांगितलंय. याउलट अशा प्रकारच्या बातम्या आणि रिपोर्ट पाहून आपल्याला आश्‍चर्याचा धक्का बसल्याचं गौबा यांनी म्हटले आहे. यामुळे आता सोशल मीडियात कुणीही कोरोनाबाबत अफवा पसरवू नये ही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content