भुसावळ नगर परिषद कर्मचाऱ्यांना मास्क व हॅन्ड ग्लोजची भेट

भुसावळ, प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे रुग्ण संख्या वाढत आहे. तसेच अमळनेर नंतर भुसावळ शहर हॉट स्पॉट बनले आहे. शहरात पोलिस, आरोग्याधिकारी व कर्मचारी यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी कोरोनाला रोखण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.या योद्धांना श्री रिदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व श्री कल्याणी चेरिटेबल तर्फे मास्क व हॅन्ड ग्लोजचे वाटप करण्यात आले.

भुसावळ शहर हे कोरोना हॉट स्पॉट बनले असून येथे पोलीस, आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी व नगर परिषदेचे कर्मचारी हे अहोरात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कार्य करीत आहेत. यात नगर परिषदेचे पथक दिवसरात्र गस्त घालत आहेत. या पथकातील कर्मचाऱ्यांसाठी श्री रिदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व श्री कल्याणी चेरिटेबलतर्फे मास्क व हॅन्ड ग्लोज न. प. लेखाधिकारि संजय बाणाईत व वैभव पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी रुग्णालयाचे संचालक डॉ. लक्ष्मीकांत नागला, डॉ. कुशल पाटील, श्री कल्याणी चेरिटेबलचे संचालक गौतम चोरडिया, श्री रिदम मेडिकलचे निलेश माळी उपस्थित होते. यापूर्वी श्री रिदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व श्री कल्याणी चेरिटेबलतर्फे पोलिस व पोलिसांना सहाय्यक असलेल्या स्वयंसेवकांना मास्क व हॅन्ड ग्लोज वितरित करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील समाजसेवकांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

Protected Content