जनतेची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करा- रिपाइंची मागणी

यावल प्रतिनिधी । यावल पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गाय गाठे मंजूर करून देण्याच्या नावाखाली जनतेची फसवणूक करणाऱ्या स.प्रकल्प अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी रिपाइंच्या वतीने गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.

रिपाइंचे शांताराम तायडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील हिंगोणा येथील रहिवाशी सामाजीक कार्यकर्ते रिपाइंचे रावेर यावल विधानसभा क्षेत्र गटप्रमुख शांताराम तायडे यांनी पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस.एस. मोरे यांनी तायडे यांच्यासह इतरांकडून ६ एप्रील २०२० रोजी गाय गोठे मंजुर करून देतो असे खोटे आमीष दाखवून तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थांकडुन लाखो रुपये उकडण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. तसेच ज्या लोकांची गायगोठ्याची प्रकरणे मंजुर झालेली आहेत त्यांचे अद्याप मस्टर देखील काढलेली नसल्याचे ग्रामस्थांच्या अनेक तक्रारीतून समोर आले आहे. अशा प्रकारे शासकीय सेवेत कार्य करीत असतांना शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळुन देण्याच्या नांवाखाली त्यांची आर्थिक फसवणुक करणाऱ्या यावल पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस.एस.मोरे भ्रष्ट अधिकारी यांच्याविरूद्ध आलेल्या तक्रारींची तात्काळ वरिष्ठांनी चौकशी करून सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी रिपाइंचे शांताराम तायडे यांनी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांच्याकडे केली आहे.

Protected Content