यावल येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने भारतरत्न महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.

यावल येथील खरेदी विक्री सहकारी संघाच्या व्यापारी संकुलनातील राष्ट्रवादी पक्षाच्या तालुका संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने भारतरत्न भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार बोधिस्तव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले , काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजीक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष नाना बोदडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, विजय पाटील, आदीवासी विभागाचे एमबी तडवी, यावल नगर परिषद माजी उपनगराध्यक्ष असलम शेख नबी, अॅड देवकांत पाटील, नरेन्द्र भैय्या पाटील, अच्युब खान, अरुण लोखंडे, अब्दुल सईद शेख, मोहसीन खान, गोलु माळी, एजाज देशमुख, गणेश महाजन, नावरे ग्रामपंचायत सरपंच संदीप सोनवणे, बापु जासुद यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहुन बहुजनाचे उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी नाना बोदडे यांनी त्रिसरण पंचशिल म्हटली व बाबासाहेबांच्या जिवनातील शेवटचे पाच दिवस कशी गेलीत या संदर्भातील त्यांचे आत्मचारित्र्य संदर्भातिल माहीती वाचवुन दाखवली.

Protected Content