जामनेर तालुक्यातील रस्ते अन् पुलांसाठी १६ कोटींचा निधी !

जामनेर प्रतिनिधी । माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्याने जामनेर तालुक्यातील विविध रस्ते आणि पुलांसाठी १६ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

तालुक्यातील विविध ठिकाणी रस्ते तसेच पुलांच्या बांधकामासाठी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी ग्रामसडक योजनेतून निधीसाठी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश आले असून जवळपास १६ कोटी रूपये मंजुर करण्यात आले असून लवकरच या कामांना सुरूवात होणार आहे.

याच्या अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत देवपिंप्री ते कुंभारी सिम दरम्यान सवतखेडा जवळील पुलासाठी ४ कोटी ८९ लाख, टाकरखेडा ते तळेगाव दरम्यान कांग नदीवरील पुलासाठी ४ कोटी २२ लाख, चिंचखेडा तवा ते जाभोंळ रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी २ कोटी ८५ लाख, चिंचखेडा ते जांभोळ रस्त्यासाठी १ कोटी ३५ लाख, गोद्री रस्त्यासाठी १ कोटी ४७ लाख, गोद्री ते किन्ही रस्त्यावरील कामांसाठी १ कोटी २८ लाख अशा पद्धतीने रस्ते व पुलांची कामे केली जाणार आहेत अशी माहिती दीपक तायडे यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.

Protected Content