गिरीशभाऊंच्या प्रतिमेची पैठणी महाजन दाम्पत्याला भेट !

Jamner जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ना. गिरीश महाजन यांची पैठणीच्या शेल्यावर प्रतिमा साकारणार्‍या कलावंताने आज महाजन दाम्पत्याला ही पैठणी भेट म्हणून दिली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री ना. गिरीश महाजन यांची प्रतिमा येवला येथील भूषण मुदगल या विणकर कारागिराने एका पैठणीच्या शेल्यावर साकारली होती. अतिशय कौशल्यपूर्ण कलाकुसरीने सुसज्ज असणारी ही पैठणी तयार करण्यासाठी मुदगल यांना तब्बल पंधरा दिवसांचा कालावधी लागला होता. या पैठणीच्या शेल्यावर ना. गिरीशभाऊ यांची अगदी हुबेहूब प्रतिमा साकारण्यात आली असून यावर संकटमोचक असे लिहले आहे.

येवला ही पैठणीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. येथील विणकर कारागीर आपली कला पैठणीच्या पदरावर सादर करत असतात. त्यामुळे येवल्याच्या पैठणीची ओळख ही देशातच नाही तर सातासमुद्र पार पोहचलेली आहे. येथील पैठणी विणकर केवळ पैठणीवर केवळ पारंपरिकच नाही तर अवघड अशा कलाकुसरीच्या वेगवेगळ्या पैठणी वर डिझाईन साकारत असतात, तर अनेक हौशी विणकर पैठणीच्या शेल्यावर धर्मिक, राजकीय ऐतिहासिक अशाच प्रतिमा साकारतात. आजवर काही मातब्बर मान्यवरांना पैठणीच्या शेल्यावर स्थान मिळाले असून यात आता ना. गिरीश महाजन यांचा समावेश झाला आहे.

दरम्यान, आज जामनेर येथे पैठणी विणकर कलावंत भूषण मुदगल यांनी असून भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष समीर समदडीया यांच्यासह नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन आणि ना. गिरीश महाजन यांना ही पैठणी सुपूर्द केली. याप्रसंगी महाजन दाम्पत्याने मुदगल यांच्या कलाकुसरीचे कौतुक केले.

Protected Content