जामनेर प्रतिनिधी । तालुक्यात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. अशा गंभीर परिस्थीतीत आमदार गिरीश महाजन पश्चीम बंगालच्या निवडणूकीत दंग आहेत. आमदारांच्या या वागणूकीचा जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पालिका चौकात फलक झळकावीत निषेध केला.
जामनेर तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. अशावेळी रूग्णांना लोकप्रतिनिधी म्हणून आधार देण्याचे व प्रशासनाशी संवाद साधून आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सोईसुवीधा पुरवीणे गेरजेचे असतांना आमदार गिरीश महाजन मात्र पश्चीम बंगालच्या निवडणूक प्रचारात दंग आहेत. जामनेर शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने ‘आमदार साहेब गेले तरी कुठे’ आमदार दाखवा, १० लाख मिळवा’ अश्या आशयाचे फलक दाखवून पालिका चौकात आंदोलन केले.
गेल्या २५ वर्षापासून महाजन यांना पश्चीम बंगालच्या नव्हे तर जामनेर तालुक्यातील मतदारांनी मतदान केले आहे. तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून पळ काढता आहेत असे आरोप यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले. तालुक्यातील जनतेची आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन असून आतातरी जनतेच्या सेवेसाठी जामनेरात या असे आवाहन यावेळी राकॉ कार्यकर्त्यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जामनेर विधानसभाक्षेत्र प्रमुख किशोर पाटील, शहराध्यक्ष जितेश(पप्पू) पाटील, सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष संदीप हिवाळे, युवक शहराध्यक्ष विनोद माळी, युनूस पहेलवान, सागर पाटील, किरण जंजाळ आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/177445600896454/