आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांच्या जामनेर साहित्य मंडळातर्फे सन्मान

पारोळा प्रतिनिधी । जामनेर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिगंबर पाटील, जे जामनेर येथील पाच संस्थांचे संस्थापक अध्यक्ष व इतर पाच संस्थांचे पदाधिकारी आहेत. यांनी पारोळा येथील आदर्श सेवानिवृत्त शिक्षक सदानंद ध. भावसार यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांच्या सेवा कार्याचा गौरव म्हणून जामनेर तालुका साहित्य-सांस्कृतिक मंडळाने त्यांना ज्येष्ठ आदर्श शिक्षक म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.

दरम्यान, जामनेर येथे २० फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजित जिल्हास्तरीय साहित्य संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण देखील दिले. भावसार यांच्या या सन्मानाबद्दल शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरांचे अभिनंदन करुन पुढील वाटचाल व निरामय आरोग्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

Protected Content