चोरीचे स्मार्टफोन विकत घेणार्‍यांनो सावधान ! : पोलिस निरिक्षकांनी दिलाय ‘हा’ इशारा

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ज्यांनी कुणी चोरीचे स्मार्टफोन विकत घेतली असतील त्यांनी तातडीने पोलीस स्थानकात जमा करावे असे आवाहनवजा इशारा पोलीस निरिक्षक किरण शिंदे यांनी दिला आहे.

जामनेर शहरासह शहरासह परिसरामध्ये मोबाईल चोराने अनेक लोकांना चोरीचे मोबाईल विकले असून ज्यांच्याकडे असे मोबाईल असतील त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला जमा करावे असे आवाहन जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केले आहे.
जामनेर पोलिसांनी एक मोबाईल चोर पकडला असून त्याने आपले परिसरात मोठ्या प्रमाणावर चोरीचे मोबाईल विकले आहेत. ज्यांनी अशा प्रकारचे चोरीचे, संशयास्पद, पक्के बिल नसलेले मोबाईल घेतले असतील त्यांनी तात्काळ ते जामनेर पोलीस स्टेशन ला जमा करावे. बरेच सुजाण नागरिक तसे मोबाईल स्वतः पोलीस स्टेशन ला आणून जमा करून देत आहेत
स्वतःहून एक-दोन दिवसात असे मोबाईल आणून दिल्यास संबंधितांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. परंतु स्वतःहून जमा न केल्यास आणि तपासात निष्पन्न झाल्यास संबंधितांना कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा पोलीस निरिक्षक किरण शिंदे यांनी दिला आहे.

Protected Content