खळबळजनक : वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार !

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटना दोन तरूणींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यातील दोघांना पोलीसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे चोपडा तालुका हदरला आहे.

पहिल्या घटनेत चोपडा तालुक्यातील एका गावात १८ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ती एमएससीआयटीचे शिक्षण घेण्यासाठी चोपडा शहरातील एका खासगी क्लासला जात असतांना मे २०२२ मध्ये गावातील विलास सुभाष भिल याने लहान भावाला मारून टाकेल अशी धमकी देत तिला दुचाकीवर बसवून चोपडा ते गोरगावले रस्त्यावरीन शेतात जबरी अत्याचार केला. तसेच पिडीत मुलीसोबतचे फोटो सोशल मीडीयावर व्हायरल करून बदनामी केली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विलास सुभाष भिल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात संशयित आरोपी विलास सुभाष भिल याला अटक करण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेत चोपडा तालुक्यातील एका गावात १८ वर्षीय तरूणी ही राहत आहे. तरूणीचे समीर सलीम पिंजारी रा. जळगाव याच्या सोबत प्रेमसंबंध आहेत. ६ जानेवारी २०२२ रोजी तरूणी त्यावेळी अल्पवयीन असतांना सकाळी ११ ते दुपारी १ वाजेच्या सुमारास चोपडा ते विरवाडे रस्त्यावरील शेतात नेवून तिच्या जबरी अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा प्रेमसंबंधातून दुसऱ्यांना अत्याचार केला. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारा तिसऱ्यांदा अत्याचार करण्याच्या प्रयत्न करतांना पिडीत तरूणीने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. याचा राग आल्याने सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार सहन न झाल्याने पीडीत मुलीने चोपडा शहर गाठत तक्रार दिली. पिडीत मुलीच्या तक्रारीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी समीर सलीम पिंजारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे करीत आहे.

Protected Content