संतापजनक : अत्याचारातून अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणारी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत केलेल्या अत्याचारातून तिने मुलाला जन्म दिल्याचा खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. अनिस शरीफ भिस्ती यांच्याशी अल्पवयीन मुलीशी ओळख निर्माण झाली. त्याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखविले. त्याचा गैरफायदा घेत अनिस शरीफ भिस्ती याने सुप्रिम कॉलनीत भाड्याने घर घेतले. तिथे अल्पवयीन मुलीला नेवून जबरी अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत मुलीने मुलाला जन्म दिला. त्यानंतर अनिसने पिडीत मुलीशी लग्न करण्याच नकार दिला व शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच फिरोरा शरीफ भिस्ती, मेहजमीन रईस भिस्ती, अनवर खान यांनी देखील पिडीत मुलीला बेदम मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलीने गुरूवारी ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर करीत आहे.

Protected Content