जळगाव, प्रतिनिधी | बाबा रामदेव रुणीच्या वाले यांच्या जयंतीनिमित्त नवल कॉलनीत जम्मा जागरण भजनांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात भाविक भजनांच्या तालावर तल्लीन झाले होते.रामदेवबाबा सेवा समिती आणि नवल मित्र मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या जम्मा जागरण भजन कार्यक्रमाला कॉंग्रेसचे अ.भा.सफाई मजदूर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अरुण चांगरे, ग.स.सोसायटीचे संचालक दिलीप चांगरे, नवल मित्र मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ चांगरे, उपाध्यक्ष मोहित चांगरे, सचिव निलेश सरपटे, मंदिराचे पुजारी ए.बी. चांगरे उपस्थित होते. कार्यक्रमात खम्मा खम्मा हो म्हारा रुनिचेरा धणीया थाणे तो पूजे अख्खो माळवाळ हो, अख्खो गुजरात हो म्हारा रुनिचेरा धणीया, पिछाम धारा सो म्हारा, पीर जी पधारीया अशा विविध भजनांवर महाराज नारायण ओझा यांनी भाविकांना खिळवून ठेवले.कार्यक्रमासाठी विशाल चांगरे, वसंत चांगरे, जयप्रकाश चांगरे, जगदीश चांगरे, अशोक चांगरे, किशोर हंसकर, चेतन चांगरे, राहुल हंसकर, अक्षय गोयर, चेतन चांगरे, किशोर हंसकर, निलेश ससाणे आदींनी परिश्रम घेतले.