इस्त्रो मध्ये निवड झालेल्या सागर चौधरीचा सत्कार

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कोथळी येथील रहिवासी ज्ञानदेव चौधरी यांचा मुलगा सागर चौधरी याची इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) मध्ये वैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे. त्याचा कोथळी ग्रामपंचायत तर्फे सत्कार करण्यात आला.

सागर चौधरी याने कोथळी गावाचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्वल केले आहे. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांनी त्याचा आदर्श मानायला हवा. यासाठी त्याने दोन वर्ष केलेली मेहनत कोथळी ग्रामस्थांनी पाहिलेली आहे. सागरचे तसेच त्याच्या आईवडिलांचे खूप खूप अभिनंदन केले. आज कोथळी ग्रामस्थांच्या तसेच कोथळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सागरचा सत्कार केला गेला.

उपस्थित सरपंच नारायण चौधरी, उपसरपंच पंकज राणे, ग्रा.पं स.योगेश राणे, ग्रा.पं स.उमेश राणे, ग्रा.पं स. मोहन कोळी, बाळाभाऊ विटकरे, विजय चौधरी, योगेश पाटील, गणेश राणे ग्रामसेवक चौधरी अप्पा इत्यादी उपस्थित होते.

Protected Content