जळगाव प्रतिनिधी । जुनी पेन्शन योजना सुरू करण्यात यावी या मागणीसाठी राज्य पेन्श संघर्ष समितीच्या वतीने भव्य संघर्ष यात्रेस सुरूवात करण्यात आली आहे. ही यात्रा ३ डिसेंबर रोजी जळगावात दाखल होणार असून शहरात जिल्हास्तीय पेन्शन महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य शासनाने 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या बांधवांना जुनी पेन्शन योजना नाकारून एन पी एस / डी सी पी एस नावाची अन्यायकारक अशी योजना लागू केली आहे. ही योजना रद्द होऊन जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी यासाठी राज्यातील 60 कर्मचारी संघटनानी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य पेन्शन संघर्ष समितीमार्फत 22 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2021 या कालावधीत आझाद मैदान ते सेवाग्राम आश्रम वर्धा अशा भव्य पेन्शन संघर्ष यात्रेस सुरुवात केली असून सदर संघर्ष यात्रेचे जळगाव येथे दिनांक 3 डिसेंबर रोजी आगमन होत आहे या उद्देशाने ठिक सकाळी 11 वाजता सरदार वल्लभाई पटेल लेवा भवण जळगाव येथे जिल्हास्तरीय पेन्शन संघर्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यासाठी जिल्ह्यातील शेकडो कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन संघर्ष समितीमार्फत करण्यात आलेले आहे.