सेवानिवृत्त अधिकाऱ्याची साडे सहा लाखात फसवणूक

 

जळगाव प्रतिनिधी । बनावट वेबसाईटवर ट्रेडिंग खाते तयार करून नफा परत करण्याच्या बहाण्याने जळगाव शहरातील मुक्ताईनगर कॉलनीतील सेवानिवृत्त एलआयसी अधिकाऱ्याची साडे सहा लाखांत फसवणुक झाली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील एसएमआयटी कॉलेजसमोर मुक्ताईनगर कॉलनी येथे चंद्रशेखर संतोषराव देशमुख वय ६७ हे वास्तव्यास आहेत. चंद्रशेखर देशमुख यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आले. संबंधितांनी देशमुख यांचा विश्वास संपादन करत बनावट वेबसाईटवर ट्रेडिंग खात्यात तयार करण्यास सांगून सदर ट्रेंडिंग खात्यांमध्ये आभासी नफा दाखवून त्यांना त्या नफ्याच्या ५० टक्के रक्कम देशमुख यांना भरण्यास सांगितले. त्यानुसार देशमुख यांनी संबंधितांनी सांगितल्यानुसार ऑनलाईन ६ लाख ५४ हजार १८९ रुपये पाठवले. देशमुख यांनी संबंधितांना पैसे परत मागितले असता फोनवर बोलणार्‍या अनोळखींनी देशमुख यांच्या खात्यातून ऑनलाइन पैसे काढून घेतले. डिसेंबर २०२० ते २९ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर देशमुख यांनी याप्रकरणी मंगळवार २९ नोव्हेंबर रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन त्यावरून फसवणूक करणार्‍या अज्ञात अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे हे करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!