जि.प. स्थायी व जलव्यवस्थापनच्या सभांकडे लक्ष

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | असमान कामाच्या वाटपांवरून वातावरण तापलेले असतांना जिल्हा परिषदेच्या स्थायी व जलव्यवस्थापन समितीच्या सभा ऑफलाईन या प्रकारात होणार असल्याने याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या जिल्हा परिषदेत असमान कामांचा मुद्दा तापला आहे. सर्वपक्षीय वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी केलेला हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. यातच आता स्थायी आणि जलव्यवस्थापन समितीच्या सभांमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सर्वच सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार येत्या शुक्रवारी स्थायी समिती आणि जलव्यवस्थापन समितीच्या ऑनलाइन सभेचा अजेंडा काढण्यात आलेला होता. दरम्यान, अध्यक्षा रंजना पाटील यांनी याबाबत प्रशासनाला सूचना देऊन या दोन्ही सभा ऑफलाइन घेण्यास सांगितले आहे.
येत्या ४ फेब्रुवारी रोजी स्थायी समिती आणि जलव्यवस्थापन समितीची सभा ऑनलाइन घेण्याबाबत अजेंडा काढण्यात आलेला आहे. अनेक सदस्यांकडून ही सभा ऑफलाइन घेण्याची मागणी सुरू असल्याने शुक्रवारी होणार्‍या दोन्ही सभा ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन घ्याव्यात असे आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी दिले आहेत. यामुळे आता या सभांमध्ये असमान वाटपाच्या निधीवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Protected Content