धुडकू सपकाळे यांच्यासह एकावर प्राणघातक हल्ला

 

dhudku sapkale

जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक कार्यकर्ते धुडकू सपकाळे यांच्यासह एकावर आज दुपारी प्राणघातक हल्ला झाल्यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, सपकाळे यांच्यावर धारदार शास्त्राने वार झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.

store advt

 

या संदर्भात अधिक असे की, धुडकू सपकाळे व गजानन देशमुख या दोघांना आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. सपकाळे यांच्यावर धारदार शास्त्राने वार झालेले होते. सपकाळे हे बेशुद्ध अवस्थेत होते. प्रकृती गंभीर असल्यामूळे त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आल्याचे वृत्त आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास एमआयडीसी हद्दीतील काशिनाथ हॉटेलजवळ एका कारमधून चौघं आले व त्यांनी थेट तलवार व बेस बॉलच्या बॅटच्या सहाय्याने हल्ला चढविला. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.

error: Content is protected !!