व्यवसाय करण्यासाठी विवाहितेला दोन लाखांची मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अक्सानगर येथील माहेर असलेल्या शिक्षिका असलेल्या विवाहितेला सोन्याचे दागिने व व्यवसाय करण्यासाठी २ लाख रूपये माहेरहून आणावे यासाठी शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार सामोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी १५ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील अक्सा नगरातील माहेर असलेल्या शिक्षिका निकहत समीर शेख (वय-४०) यांचा विवाह भुसावळ येथील समीर उर्फ शरीफ रशिद शेख यांच्याशी रितीरिवाजानुसार सन-२०१५ मध्ये झालेला आहे. दरम्यान विवाहिता आणि तिचे पती समीर शेख यांच्या कौटूंबिक वाद झाला. यातून समीर शेख याने विवाहितेला माहेरहून सोन्याचे दागिने, फर्निचर आणि व्यवसाय करण्यासाठी २ लाख रूपये आणावे अशी मागणी केली. दरम्यान, विवाहितेने पैशांची पुर्तता न केल्याने तिला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच सासरच्या मंडळींनी देखील विवाहितेकडे पैशांचा तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. शनिवारी १५ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती समीर उर्फ शरीफ रशिद शेख, करामत रशिद शेख , शेख रशिद शेख अहमद, सईद रशिद शेख , रजिया रफिक शेख, अमीना रौफ शेख सर्व रा. गौसिया नगर, भुसावळ यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.

 

Protected Content