महिलेशी अंगलट करत विनयभंग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील बळीराम पेठ परिसरात राहणाऱ्या महिलेला वयोवृध्दाने आपल्या सोबत संबंध ठेवण्याची मागणी करत जीवे ठार मारण्याची धमकी देत अंगलट करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवार १५ ऑक्टोबर रोजी एकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, बळीराम पेठ परिसरात ४२ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्या परिसरात राहणारा विजय विनायक काळकर (वय-६१) याने महिलेला १५ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता घरी जात असतांना रस्त्यावर अडवून तिच्या कडे संबंध ठेवण्याची मागणी केली. तसेच तिची ओढणी ओढत तिचा विनयभंग केला आणि शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. तू जर नकार दिला तर याचे परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली. यावेळी इतर नागरीकांना पाहून संशयित पसार झाला होता. दरम्यान, भेदरलेल्या अवस्थेत महिलेने शहर  पोलीस ठाण्यात धाव  घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी विजय विनायक काळकर याच्या विरोधात उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोनार करीत आहे.

Protected Content