Home क्राईम यावल शहरातून तरूणी बेपत्ता

यावल शहरातून तरूणी बेपत्ता

0
38

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवण क्लासला जावून येते असे सांगून गेलेली १८ वर्षीय तरूणी यावल शहरातील कुंभारटेकडी येथून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या सविस्तर माहीतीनुसार, यावल शहराला लागुन असलेल्या कुंभारटेकडी परिसरात राहणारी सपना रघुनाथ कुंभार (वय-१८) ही तरूणी तिचे वडील पाळधी ता.धरणगाव येथे काही कामा निमित्ताने गेले असता कुंभारटेकडी यांच्या घरी त्यांची पत्नी मुलगा व मुलगी हे घरी होते. त्यांची मोठी मुलगी सपना कुंभार ही शनिवारी १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता शिवण क्लासला जाते असे आईला सांगुन गेली. सायंकाळी उशीरापर्यंत तरूणी घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही आढळून आली नाही. रविवारी १६ ऑक्टोबर रोजी तरूणीच्या नातेवाईकांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बालक बाऱ्हे हे करीत आहे.


Protected Content

Play sound