वरूण सरदेसाई जळगावात दाखल; शिवसेनेतर्फे स्वागत

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा दौर्‍यावर आलेले युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई आज पहाटे रेल्वे स्थानकावर आले असता त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत आज जळगाव व पारोळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, वरूण सरदेसाई हे आज एक दिवसाच्या जळगाव जिल्हा दौर्‍यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमत होणार आहेत. महापौरांनी मेहरूणमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. यात त्यांची वही तुला करण्यात येणार असून यातून जमा करण्यात आलेल्या वह्या कोकण आणि पश्‍चीम महाराष्ट्रातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना पाठविण्यात येणार आहेत. ते मेहरूण तलाव परिसराची पाहणी देखील करणार आहेत. तर यानंतर राजे छत्रपती संभाजी महाराज सभागृहात त्यांच्या उपस्थितीत युवा संवाद कार्यक्रम होणार आहे. यानंतर दुपारी पारोळा येथे कार्यक्रम होणार आहे.

दरम्यान, आज सकाळी ट्रेनने वरण सरदेसाई यांचे आगमन झाले असता शिवसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, नगरवसेवक विराज कावडिया यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!