राष्ट्रवादी कॉंग्रेस सहकार सेलच्या जिल्हाध्यक्षपदी वाल्मीक पाटील

जळगाव प्रतिनिधी | नुकत्याच नव्याने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सहकार सेलच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्हा बँकेचे संचालक वाल्मीकमामा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकार क्षेत्रात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सहकार सेल सुरू केले असून जळगाव जिल्हा राष्ट्रवादी सेल ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी वाल्मीक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी सहकार विभागाची निर्मिती झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे काम महाराष्ट्रभर सुरू झाले आहे. सहकार क्षेत्रातल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी सहकार विभाग कार्यान्वित झाला आहे. या विभागाकडे शरद पवार लक्ष ठेवून आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात सहकार क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तींना जिल्हाध्यक्षपदी नेमण्यात आले आहे.

या अनुषंगाने जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे माजी संचालक तसेच नियोजन मंडळाचे सदस्य वाल्मीक पाटील यांची नियुक्ती झाली. पाटील यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सहकार विभागाचे प्रदेशाध्यक्ष डी. वाय. पगारे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तिपत्र देण्यात आले आहे.

वाल्मीकमामा पाटील हे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे कट्टर समर्थक असून जिल्हा बँकेचे संचालक आहेत. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!