‘उडाण’ योजनेला मुदतवाढ मिळावी : खा. उन्मेष पाटील

जळगाव Jalgaon-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘उडाण’ योजनेला Jalgaon Airport जळगाव विमानतळासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केली आहे.

जळगाव विमानतळाचा सर्वंकष विकास झाला आहे.येथून देशातील सहावे फ्लाईट ट्रेनिंग इन्स्टिट्युट सुरु झाले आहे.जिल्हयात विवीध उद्योगांच्या विकासासाठी मदत ठरणारी विमानसेवा जळगाव विमानतळावरून कोरोना नंतर बंद झाली होती. सद्यस्थितीत येथून ट्रू जेट कंपनीने आपली विमान सेवा बंद केल्याने येथील व्यापारी उद्योजक व जनतेला हवाई सेवेपासून वंचित राहावे लागत आहे ही बाब जळगावच्या विकासाला बाधक ठरत असून पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून ‘उडे देश का आम नागरिक’ या ‘उडान’ योजनेचा जळगाव विमानतळावरील कालावधी वाढवून द्यावा. अशी जोरदार मागणी काल खासदार उन्मेषदादा पाटील MP Unmesh Patil Jalgaon यांनी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे.

विमानसेवा सुरू करावी

जळगाव विमानतळ Jalgaon Airport हे उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे विमानतळ असून या ठिकाणी केंद्र सरकारच्या मदतीने देशातील सहा प्रशिक्षण केंद्रापैकी एक असलेले फ्लाईट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन मंजूर करण्यात आलेले असून वैमानिक प्रशिक्षण देखील सुरु झालेले आहे. तसेच जगविख्यात अजिंठा व वेरूळ लेणी या पर्यटन स्थळांना सर्वात जवळचे विमानतळ म्हणजे हे जळगाव विमानतळ असून पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे.
यापूर्वी केंद्र सरकारच्या उडान (उडे देश का आम नागरिक) या योजनेच्या माध्यमातून जळगाव विमानतळ येथे ट्रू जेट या कंपनीने विमान सेवेस सुरुवात केली होती. परंतु मागील एक वर्षाच्या कालावधीपासून सदरील विमानसेवा ही बंद करण्यात आलेली आहे. जळगाव विमानतळावरील अत्याधुनिक सुविधा जसे नाईट लाइंडिंग इ. पाहता या ठिकाणी विमान सेवेस मोठा संधी उपलब्ध आहे. परंतू विमानसेवा बंद झाल्याने स्थानिक व्यापारी उद्योजक विद्यार्थी नागरिकांना त्यांच्या उद्योग व व्यापार विस्तारीकरण शैक्षणिक कामांकरिता देशांतर्गत प्रवास करण्यास फार मोठ्या प्रमाणात गैरसोयींना सामोरे जावा लागत आहे.

या अनुषंगाने खासदार उन्मेशषदादा पाटील यांनी लोकसभेत बोलतांना नमूद केले की जळगाव जिल्ह्याची आर्थिक उन्नती पाहता उद्योजक विद्यार्थी प्रवाशांची मागणी लक्षात घेता जळगाव विमानतळास ‘उडान’ (उडे देश का आम नागरिक) योजनेचा कालावधी वाढवून देऊन जळगाव विमानतळाहून मुंबई पुणे दिल्ली बेंगलोर हैदराबाद इत्यादी शहरांना हवाई प्रवासाकरीता विमानसेवेची सुविधा उपलब्ध करुन द्यावी.जेणेकरून जळगाव जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने चालना मिळेल व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न उडे देश का आम नागरिक हे पूर्ण होण्यास मदत होईल. अशी अपेक्षा खासदार उन्मेशषादा पाटील यांनी लोकसभेच्या पटलावर मांडली आहे.

Protected Content