जळगाव तालुका शिवसेनेच्या महत्वपूर्ण बैठकीचे उद्या आयोजन


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी जळगाव तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे एक महत्वाची बैठक बुधवार, ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक शिवसेना जिल्हा कार्यालय, गोलाणी मार्केट, जळगाव येथे पार पडणार असून, तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती अनिवार्य असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या बैठकीस शिवसेनेचे उपनेते व जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत, उपनेते गुलाबराव वाघ, माजी खासदार उन्मेष दादा पाटील, जिल्हा प्रमुख कुलभूषण भाऊ पाटील, लोकसभा संघटक करणदादा पवार, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश भाऊ चौधरी, महिला जिल्हा संघटिका महानंदा ताई पाटील, महानगर प्रमुख शरदआबा तायडे, महानगर प्रमुख मनिषाताई पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश आबा पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे आणि उपजिल्हा संघटक योगेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीसाठी रणनीती ठरविणे, संघटनात्मक बळकटीकरण, आणि पक्ष कार्यकर्त्यांमधील समन्वय यावर सखोल चर्चा होणार आहे. शेतकरी सेना, युवासेना, वैद्यकीय सेना, महिला आघाडी आणि अंगिकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या बैठकीत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बैठकीनंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली असून, या उपक्रमाचे आयोजन जळगाव तालुका प्रमुख प्रमोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.

या बैठकीमुळे आगामी निवडणुकांसाठी पक्षाची संघटनात्मक तयारी अधिक मजबूत होईल, असा विश्वास स्थानिक शिवसैनिकांमध्ये व्यक्त केला जात आहे.