जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कमरदुखी, सांधेदुखीसह विविध वेदनांवर अल्टरनेट हिलींग प्रणालीच्या माध्यमातून वेदना मुक्ती मिळवून देण्यासाठी आजपासून तीन दिवसीय शिबिराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे.
दयाल तोष्णीवाल हे राधे अल्टनेट हिलींग सेंटरच्या माध्यमातून विविध विकारांवर उपचार करण्यासाठी ख्यात आहेत. कोणत्याही प्रकारच्या औषधी तसेच शल्यक्रियेसह आधुनीक तंत्राचा वापर न करता ते प्राचीन ज्ञानाच्या माध्यमातून रूग्णसेवा करत आहेत. आता त्यांच्याच पुढाकाराने जळगाव शहरात तीन दिवसीय वेदना मुक्ती शिबिर सुरू झाले आहे. हे शिबिर रविवार दिनांक ८ ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे.
या शिबिरात मानदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आदी शारीरीक व्याधींवर वेदनारहीत उपचार करण्यात येणार आहेत. अनेकांना कमरदुखीने हैराण केले असून बर्याच प्रकारच्या औषधोपचार करून देखील काहीही फरक पडत नाही. सर्व्हायकल अर्थात मानदुखी हा देखील कॉमन विकार आहे. तर याचमुळे अनेकांचा चालत असतांना चक्कर येतात. या सर्वांवर सदर शिबिरात उपचार करण्यात येणार आहे. हे शिबिर बजरंग पुलाजवळ असलेल्या श्रीकृष्ण कॉलनीतील सिध्देश्वर महादेव मंदिराच्या जवळ आयोजीत करण्यात आलेले आहे. या संदर्भात कुणाला शिबिरात उपचार करावयाचे असतील तर त्यांनी दयाल तोष्णीवाल यांच्याशी 8055961021 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.