कोरोना संदर्भात एरंडोल व पारोळा तालुक्यात आ. चिमणराव पाटीलांची बैठक

पारोळा प्रतिनिधी । राज्यासह संपुर्ण विश्वात थैमान घातलेल्या कोरोना विषाणुचा गेल्या १५ दिवसांपासुन एरंडोल व पारोळा तालुक्यात रूग्ण संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभुमीवर एरंडोल व पारोळा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणावार पसरू नये, यासाठी आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथे बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. 

याबैठकीत आमदार चिमणराव पाटील यांनी एरंडोल व पारोळा तालुक्यात त्वरीत कोविड सेंटर सुरू करणेसाठी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून उपस्थित अधिकाऱ्यांना  कोविड सेंटर त्वरीत सुरू करण्याचा सुचना केल्या. प्रशासनाचा नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याचा सुचना दिल्या. यावेळी उपस्थित पारोळा नगरपरिषदेचे नगरसेवक पी.जी. पाटील यांनी कोरोना संक्रमित रूग्ण होम कॉनटाईम न राहता बिनधास्तपणे बाहेर फिरत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आणुन दिले. यावर आमदार साहेबांनी अश्यांना पहिल्या वेळेस समज द्यावी व परत दुसऱ्यांदा आढल्यास त्यांचावर गुन्हा दाखल करण्याचा सुचना केल्या, तसेच एरंडोल बुधवार व पारोळा सोमवार असे आठवड्यातुन १ दिवस १००% बंद पाळण्याचे उपस्थित सर्वांचा सहमतीने ठरवण्यात आले. याप्रसंगी पारोळा तालुका बैठकीत – प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसिलदार अनिल गवांदे, नगरपरिषद मुख्याधिकारी श्रीमती ज्योती भगत, पोलीस उपनिरिक्षक बागुल साहेब, वैद्यकीय अधिकारी डाॕ.योगेश साळुंखे, म.रा.वि.वी.कं.उपअभियंता पाटील साहेब, शहरतलाठी निशिकांत माने, शेतकी संघाचे संचालक आधार पाटील, नगरपरिषदेचे  उपनगराध्यक्ष दिपक अनुष्ठान, नगरसेवक पी.जी.पाटील, नितीन सोनार, संजय पाटील, अमोल चौधरी, गौरव बडगुजर, सर्व व्यापारी बांधव, पत्रकार आदी. उपस्थित होते. 

एरंडोल बैठकीत – नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी, प्रांताधिकारी विनय गोसावी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, नायब तहसिलदार शिरसाठ साहेब, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, वैद्यकीय अधिकारी डाॕ.कैलास पाटील, डाॕ.शेख, जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, पंचायत समिती उपसभापती अनिलभाऊ महाजन, नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अभिजित पाटील, नगरसेवक चिंतामणभाऊ महाजन, कुणालभाऊ महाजन, योगेशभाऊ महाजन तसेच राजुभाऊ ठाकुर, पन्नाभाऊ सोनवणे, जग्गुदादा ठाकुर, कुणाल पाटील, परेशभाऊ बिर्ला व व्यापारी बांधव, शहरातील नागरीक व पत्रकार आदी. उपस्थित होते.

Protected Content